You are currently viewing करुळ घाटात भला मोठा दरडीचा दगड निसटून आला रस्त्यावर.मोठा अनर्थ तळला..

करुळ घाटात भला मोठा दरडीचा दगड निसटून आला रस्त्यावर.मोठा अनर्थ तळला..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दरडीचा एक भला मोठा दगड निसटून रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने त्याघटनेवेळी सदर ठिकाणी कोणतीही वाहन नसल्याने दुर्घटना घडली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह करुळ घाटात धाव घेतली व जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

अभिप्राय द्या..