चिपी विमानतळाचे काम हे हौवशे, नवशै,गवशै खासदारमुळे झालेले नाही.;माजी खासदार निलेश राणे.

चिपी विमानतळाचे काम हे हौवशे, नवशै,गवशै खासदारमुळे झालेले नाही.;माजी खासदार निलेश राणे.

कुडाळ /-

चिपी विमानतळाचे काम हे हौवशे, नवशै, गवशै खासदारमुळे झालेले नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळेच हे विमानतळ होऊ शकले असे माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे सांगितले. ते सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनासाठी कुडाळ येथे आले होते यावेळी त्यांनी देशासह महाराष्ट्रातील जनतेवर आलेल्या संकटावर मात करण्याची ताकत देवो अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.
माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग राजाचे दर्शन कुडाळ येथे घेतले यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हाला ईश्वराने भरपूर काही दिले आहे आम्ही समाधानी आहोत पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारी आणि त्यानंतर बेरोजगारी अशी अनेक संकटे जनतेवर आली आहेत या संकटातून मार्ग काढून त्या संकटाशी लढण्याची ताकद देशासह महाराष्ट्रातील जनतेला गणरायाने देवो अशी प्रार्थना सिंधुदुर्ग राजाच्या चरणी केली असे सांगितले.
हे काम हौवश्या, गवश्यांचे नाही…..
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की चिपी विमानतळ हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळेच झाले आहे आणि त्याचे उद्घाटन ते केंद्रीय मंत्री झाल्यावरच जाहीर झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वजन काय आहे हे जनतेला माहिती आहे आणि जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे हेसुद्धा जनतेला माहीत असल्यामुळे कोणीही बाता मारू नये चिपी विमानतळाचे काम करण्याची हिम्मत हौवशे, नवशे, गवशे खासदारांमध्ये नाही असा टोला त्यांनी विनायक राऊत यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा कार्यकारणीचे राजू राऊळ, आनंद शिरवलकर, विशाल परब, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष ओरोस मंडळ दादा साईल, शहर अध्यक्ष राकेश कांदे, राजेश पडते, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, रूपेश कानडे, पप्प्या तवटे, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, ममता धुरी, चेतन धुरी, अशोक कंदुरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..