You are currently viewing शासनाचा कालिदास पुरस्कार प्राप्त वेदाचार्य दत्तात्रय मुरवणे यांचा वायंगणीत सत्कार!

शासनाचा कालिदास पुरस्कार प्राप्त वेदाचार्य दत्तात्रय मुरवणे यांचा वायंगणीत सत्कार!

मसुरे /-

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदपाठशाळेचे गुरुजी वेदाचार्य दत्तात्रय (दत्ता) महादेव मुरवणे यांना शासनाचा मानाचा समजला जाणारा सन 2018 चा कालिदास पुरस्कार तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे हस्ते नागपुर येथे प्रदान करण्यात आला. श्री. मुरवणे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत गणेश प्रभू व निवृत्त केंद्र प्रमुख लक्ष्मण गणेश प्रभू आणि प्रभू कुटुंबीय यांचेकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दत्तात्रय मुरवणे यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे गावाचा सन्मान झाला असल्याचे यावेळी हनुमंत प्रभू म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा