परुळे /-


कोरोनाच्या काळात मुलांच्या कलाविषयक विविध उपक्रम पाट हायस्कूलमध्ये घेण्यात आले .यामध्ये निसर्ग चित्र स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा ,गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माती, कागदाचा लगदा अशा माध्यमातून सुंदर सुंदर सुबक मूर्ती मुलांनी तयार केल्याअसून त्याचे प्रदर्शन पाट हायस्कूलच्या कलादालनात ठेवण्यात आल्या आहेत. कलाविषयक आवड निर्माण व्हावी नवीन तयार कलाकार व्हावेत या उद्देशाने असे उपक्रम नेहमीच हायस्कूल मध्ये घेण्यात येतात या स्पर्धांमध्ये मुलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. स्पर्धा आयोजनात विद्यार्थी शिक्षक यांच्याबरोबर माजी विद्यार्थी यांच्या ऋणानुबंध संस्थेचाही मोठा सहभाग असतो .या गणेश बालमूर्ती कलाकारांचे सर्वांकडून कौतुक होत आहे .एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट मुख्याध्यापक श्री शामराव कोरे पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर सर यांनीही कौतुक केले या स्पर्धेसाठी मार्गदर्शन कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page