You are currently viewing सावंतवाडीत गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी..

सावंतवाडीत गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी..

सावंतवाडी /-


गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळीच सर्व दुकाने सज्ज झाली होती. मात्र दुपारनंतर पावसाने जोरदार संततधार सुरु केल्याने व्यापाऱ्यांची तसेच नागरीकांची मोठी गैरसोय झाली. जोरदार पावसामुळे नागरीकांच्या खरेदीच्या आनंदावर विरजण्ा पडले. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावरच पावसाचा जोर अधिक असल्याने नागरीकांचे पुरते हाल झाले. तसेच पावसाबरोबरच वाहतूक कोंडीचाही सामना सर्वांना करावा लागला. बाजारपेठेत होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. विनामास्क फिरणाऱ्यांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून करवाई केली जात होती.

अभिप्राय द्या..