You are currently viewing सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या एक हात मदतीचा घरघंट्टीचा गृहउद्योग उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत..

सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या एक हात मदतीचा घरघंट्टीचा गृहउद्योग उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत..

कुडाळ /-


हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने विविध उपक्रमात सहभागी होऊन यशस्वी कामगिरी केली आहे विशेष म्हणजे सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या एक हात मदतीचा हा घरघंट्टीचा गृहउद्योग उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांच्या सुकन्या कु रुची राऊत यांनी हुमरमळा वालावल येथे केले
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या या ग्रामपंचायतीने एक हात मदतीचा हा उपक्रम हाती घेऊन अतिशय गरीब कुटुंबाला घरघंट्टी देण्याचा उपक्रम सुरू केला त्याचे वितरण कु राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कु राऊत म्हणाल्या विकास कामे करण्यासाठी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक आहेत परंतु कोरोना च्या महामारीच्या संकटात प्रत्येक ग्रामपंचायतीने चांगले काम केले आहे मात्र हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने एक वेगळा पायंडा घातला की प्रत्येक वाडीत एक लाभार्थी देऊन घरघंट्टी देऊन त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळवुन दीले आहे हा उपक्रम अतिशय चांगला असुन सरपंच सौ अर्चना बंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत गावच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे योगदान दिले आहे हे पाहून समाधान वाटले यावेळी सरपंच सौ अर्चना बंगे, ग्रामसेविका श्रीमती अपर्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ गिरीजा गुंजकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माड्ये, रमाकांत परब, सुरेश परकर, धनंजय परकर, सुरेश कानडे, बबन हळदणकर, अमित बंगे, बाबल मांजरेकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा