You are currently viewing मकरंद तोरसकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार जाहीर..

मकरंद तोरसकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार जाहीर..

सावंतवाडी /-


नॅशनल रुरल डेव्हलमेंट फाउंडेशन ऑर्गनायझेशन बेळगावी – हेल्थ अँड नेचर सोसायटी बेळगावी यांच्यामार्फत उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याची दखल घेऊन सदर संस्थेने महत्वपूर्ण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. मकरंद तोरसकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. बांदा नवभारत संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक तर बांदा ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी पुढे नेला आहे. कै. आबासाहेबांच्या आशिर्वादाने भविष्यातही आपण समाजसेवेचा वारसा अखंडपणे चालू ठेवू असा मनोदय मकरंद तोरसकर यांनी व्यक्त केला. मकरंद तोरसकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..