You are currently viewing राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू रौप्य पदक विजेता जयेश परब यांचा वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सत्कार..

राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू रौप्य पदक विजेता जयेश परब यांचा वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /-


राष्ट्रीय खेळाडू जयेश राजन परब याचे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड होऊन राजस्थान येथे ३०,३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने पुष्पगुच्छ व शाल घालून सन्मान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या सत्कार प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई,भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेविका शितल आंगचेकर, परबवाडा सरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य व युवमोर्चा जिल्हा चिटणीस हेमंत गावडे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका चिटणीस समिर चिंदरकर, किसान मोर्चा चे बाळू प्रभू , पुंडलिक हळदणकर , नामदेव सरमळकर , सत्यवान परब , गौरेश वायंगणकर , आकाश साळकर , निखिल गावडे , प्रथमेश गावडे , कौस्तुभ वायंगणकर , संतोष परब, कृष्णा हळदणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा