You are currently viewing नागेंद्र परब म्हणजे नारायण राणे यांचे कार्यकर्ते नव्हेत टक्केवारी मागायला.;बबन बोभाटे.

नागेंद्र परब म्हणजे नारायण राणे यांचे कार्यकर्ते नव्हेत टक्केवारी मागायला.;बबन बोभाटे.

कुडाळ /-

जिल्हा परिषद सदस्य शिवसेना गटनेते नागेंद्र परब परब म्हणजे स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस असुन ते खासदार विनायक राऊत यांचे सच्चे समर्थक आणि कडवट शिवसैनिक असुन नारायण राणे यांचे कार्यकर्ते नसुन टक्केवारीची भाषा राणे समर्थक भाजपाला शोभते असा खणखणीत टोला कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी हाणला जि प बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी जि प गटनेते नागेंद्र परब यांच्या वर टक्के वारीचा आरोप केला होता यावर बोलताना श्री बोभाटे म्हणाले ज्या पध्दतीने खासदार विनायक राऊत यांनी या लोकसभा मतदारसंघात बॅ नाथ पै प्रा मधु दंडवते यांची परंपरा जोपासत आपले काम केले आहे त्याच पध्दतीने जि प गटनेते नागेंद्र परब आपल्या नावाला गाल बोट लागू नये याची दक्षता नेहमीच घेत असुन श्री परब म्हणजे आम्हा शिवसैनिकांना आदर्श असुन तसे संस्कार शिवसेना पक्षाचे आहेत आणि हो टक्केवारी व ठेकेदीरी या साठी हपापणारे राणे समर्थक भाजपवाले असुन शिवसेनेच्या संस्कारात बसत नाही असा सणसणीत टोला हाणत श्री बोभाटे म्हणाले जिल्हा परिषद मधील भ्रष्टाचार बाहेर काढून जनतेसमोर लक्तरे उघडी करत असल्याने राणे समर्थक भाजप चलबिचल झाले असुन नागेंद्र परब यांच्या वर खोटे नाटे आरोप आम्ही सहन करणार नाहीत असा इशारा श्री बोभाटे यांनी देऊन जिल्हा परीषदेने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढतच रहाणार असा इशारा श्री बोभाटे यांनी दीला

अभिप्राय द्या..