You are currently viewing युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा..

युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा..

मालवण /-

युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा..
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात गुरु आणि शिष्य हा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे..
आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात.
भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी मालवण मध्ये युवक काँग्रेसने देखील जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला

प्रत्येकाच्या जीवनात गुरू चे महत्त्व असतं त्याच प्रमाणे समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं या स्वरूपात पदाधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

  • सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण भारत देशात सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं म्हणूनच आम्ही देखील आपला गुरुजनांचा सत्कार करणं आपलं भाग्य समजतो – अरविंद मोंडकर, जिल्हा युवक प्रवक्ते

शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते –
देवानंद लुडबे.

आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याच महत्त्व समजवण्यासाठी व शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो त्यामुळे आम्ही देखील आज आपल्या शिक्षकांच्या प्रति त्यांचे ऋण व्यक्त करतो –
पल्लवी तारी

या प्रकारे युवक पदाधिकारी यांनी आपापलं मनोगत व्यक्त केले

रिटायर्ड झाल्या नंतर आम्हाला ही सामाजिक कार्यात यायच असत परंतु या उतार वयात जास्त धावपळ जमत नसते तरी ही युवक काँग्रेस च्या वतीने आम्हा शिक्षकांना एकत्रित करून आमचा सत्कार करण्यात येतोय ही आम्हाला गुरू दक्षिणा देत आहात व या निमित्ताने सर्व एकत्रित आल्याने पुन्हा वर्ग भरल्याचा आनंद आम्हांस झाला – विनायक कोळंबकर सर
यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने युवक पदाधिकारी यांचे आभार मानले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद मोंडकर यांनी तर प्रस्तावना सौ. नीलम करंगुटकर यांनी केली
यावेळी जिल्हा युवक चे देवानंद लुडबे, युवक प्रवक्ते अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, हर्षदा पाटील, पल्लवी तारी, मा.शिक्षक विनायक कोळंबकर, रमेश आचरेकर, श्रीकृष्ण नातू, दिलीप नार्वेकर, रंजन तांबे, अभय शेर्लेकर, दीपक जाधव, शिक्षिका प्रभावती वाडकर, जयश्री हडकर,मिनल सारंग, मिनल वस्त, रश्मी आचरेकर, शोभा माडये, सुप्रिया बांदेकर, हेमा परुळेकर, शोभना नातू, फिलोमीना पंडित, अदिती शेर्लेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..