जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात.;शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात.;शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

कुडाळ /-

जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात असा आरोप शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब शनिवारी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला
जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे अमरसेन सावंत, संजय भोगटे , अतुल बंगे , राजू गवंडे आदी उपस्थित होते यावेळी नागेंद्र परब यांनी सांगितले जिल्हा परिषदेचे सध्याचे कामकाज बघता ठेकेदार कार्यकर्ते चालवतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

सन 2020 21 च्या जिल्हा वार्षिक आराखड्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी सात कोटीचा निधी मंजूर केला हा निधी लाटण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झालेल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये तालुकास्तरावरील गट शिक्षण अधिकाऱ्यांना हे काम आम्ही करणार आहे असा ना हरकतदाखला मिळवण्यासाठी पाठवण्यात आले तसे गशींकडून ग्रामपंचायतीवर दबाव आणण्यात येत आहे असे नारकं दाखले देण्यास नकार दिल्यावर मंजूर झालेले काम वगळण्याचा प्रकारही करण्यात आला असे गटशिक्षणाधिकारी करू शकतात का असा प्रश्न परब यांनी केला शिक्षक वर्गात करुनही सरपंचाना धमकावण्यात येत आहे हे सर्व जिल्हा परिषदेमार्फत ठेकेदार कार्यकर्त्यांना पोचण्याचे काम करण्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला जि प अध्यक्षांकडून ठेकेदारांना पोसण्याचे काम होत असून जिल्हा परिषद ठेकेदारांचा अड्डा झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.


धर्मान केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे रोग्य विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या रद्द केल्या मात्र जिल्हा परिषदेतील राणेसमर्थक भाजप शासनाच्या निषेधाचा ठराव करतात अशाप्रकारे अडाणी लोक जिपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकारने प्रकल्प आराखड्यात मंजूर न केलेली पदे रद्द केली त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षा केंद्र शासनाचा निषेधाचा ठराव मांडणार का माहिती न घेता राज्य शासनावर आप्पा कड करण्यापेक्षात्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पर्याय काढून वाचवले पाहिजे होते जसे धुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलेत अशाप्रकारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे होते मात्र तसे न करता ठेकेदारी साठी जिल्हा परिषद चा वापर करणाऱ्या जिपमधील कामाचा यापुढे पंचनामा करू असा इशारा त्यांनी दिला तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी शिवसेनेने मार्फत प्रयत्न कधी त्याला न्याय दिला जाईल असे सांगितले.

अभिप्राय द्या..