You are currently viewing दिगवळे – रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

दिगवळे – रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

कणकवली /-

दिगवळे रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण आज पोलिसांच्या बंदोबस्तात हटविण्यात आले. जि. प. च्या मालकीच्या या रस्त्यावर चिरे टाकून अतिक्रमण करत रस्ता अडविण्यात आला होता. हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख6 प्रथमेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रथमेश सावंत यांनी या अतिक्रमणाविरोधात पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांचे लक्ष वेधले होते. हे अतिक्रमण त्वरित हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही पालकमंत्री सामंत, खासदार राऊत यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जि. प. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. दिपाली पाटील यांनी सदर बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटविण्याचे आदेश जि. प. बांधकाम विभाग उपअभियंता कणकवली यांना दिले होते. उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपअभियंत्यांनी सदर अतिक्रमण हटविण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षकांकडे पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी 30 ऑगस्ट रोजी केली होती. त्यानुसार आज पोलिसांच्या बंदोबस्तात दिगवळे रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने प्रथमेश सावंत यांनी दिलेल्या लढ्याला यश आले असून ग्रामस्थांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..