मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ

मुंबई /-

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाची रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय.गेल्या 8 दिवसांपासून कोरोना रूग्णांचा कमी होत असलेला आलेख पुन्हा चढताना दिसतोय.10 दिवसांत रोजची रूग्णसंख्या 400 पार होत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल केल्यामुळे रूग्णसंख्या वाढतेय का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दुसरीकडे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या आणि प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढू लागली आहे. 18 ऑगस्टला मुंबईत 24 इमारती प्रतिबंधित होत्या. तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ही संख्या 48 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या इमारतींमधील 1200 हून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

मुंबईत 3 सप्टेंबर रोजी 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला असून मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतरुग्ण दुपटीचा दर 1416 दिवसांवर गेला आहे.तर दुसरीकडे राज्यात राज्यात 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अभिप्राय द्या..