गणेश चतुर्थीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल.;अँड.सुहास सावंत यांचा ईशारा..

गणेश चतुर्थीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल.;अँड.सुहास सावंत यांचा ईशारा..

कुडाळ /-

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी वेळत्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न रखडले असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेतसांगितले गणेश चतुर्थीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन मराठा समाज छेडेल असा इशारा यावेळी दिला तसेच महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बंड्या सावंत, संग्राम सावंत, शैलेश घोगळे उपस्थित होते यावेळी एड. सुहास सावंत यांनी सांगितले की या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटत नाही त्यामुळेच या सरकारमधील मंत्री हे मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत तसेच कोणतेही काम मराठा समाजाच्या संदर्भात असेल तर ते करण्यासाठी वेळ देत नाही असाही आरोप त्यांनी करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जवळ गेली वर्षभर मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाचे असलेले प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागितली जात आहे पण पालकमंत्री उदय सामंत यांच्याजवळ मराठा समाजाला समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी वेळच नाही असा गंभीर आरोप त्यांनी करून कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला ते दोन- दोन तास वेळ देऊ शकतात पण मराठा समाजाला पाच मिनिटे सुद्धा वेळ ते देऊ शकत नाही ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे मराठा समाजाला वेळ देण्यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार सुद्धा त्यांना केला पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केला १४ जुलै रोजी त्यांनी फक्त पाच मिनिटे सुद्धा आमचे प्रश्न ऐकून घेतले नाहीत. तसेच त्यांच्याजवळ जे मंत्रालय आहे त्या संदर्भातही प्रश्न अनेक आहेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही हे प्रश्न जर त्यांनी ऐकून घेतले असते तर मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असता पालकमंत्र्यांच्या या वृत्तीमुळे विद्यार्थ्यामागे ४८ हजार रुपयांचे नुकसान शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांचे झाले आहे. असे पालकमंत्री काय कामाचे आहेत. त्यांच्या या एकंदर प्रकारामुळे प्रशासनामध्ये सुद्धा त्यांचा वचक नाही हे सुद्धा दिसून आले आहे तसेच खासदार विनायक राऊत यांच्या जवळ सुद्धा आम्ही वेळ मागितली होती त्यांनी सुद्धा आम्हाला अद्याप वेळ दिलेली नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ टक्के मराठा समाज आहे आणि या समाजाच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी तसेच ते प्रश्न ऐकून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांना वेळ नाही हे आमचे दुर्दैव आहे त्यामुळे सकल मराठा समाजाची लवकरच बैठक घेऊन गणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिला.

अभिप्राय द्या..