You are currently viewing शिवसेनेच्या पाठपुराव्यातून भडगावात १५० नागरिकांचे कोवीड लसीकरण..

शिवसेनेच्या पाठपुराव्यातून भडगावात १५० नागरिकांचे कोवीड लसीकरण..

कुडाळ/-

भडगाव खुर्द येथील ग्रामस्थांकडून आमदार मा. वैभवजी नाईक यांच्याकडे लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे आमदार महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या सूचनेनुसार व भडगाव उपसरपंच श्री तुळशीदास (बाबी) गुरव यांच्या पाठपुराव्यामुळे भडगाव खुर्द मध्ये आज शनिवारी १५० कोवीशिल्ड च्या लसी देण्यात आल्या. १८ वर्षावरील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. गावातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. उर्वरित नागरिकांचे लसीकरणही शिवसेनेच्या पाठपुराव्यातून लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. या लसीकणासाठी भडगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी अमूल्य सहकार्य केले आहे. गणेशोत्सवापूर्वी या लसीकरणाचा लाभ मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तसेच आमदार मा वैभवजी नाईक व उपसरपंच श्री बाबी गुरव यांचे आभार मानले जात आहेत. अशी माहिती भडगाव गावातील ग्रामस्थ श्री हिराजी गुरव व श्री चंदन (काका) गुरव यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..