You are currently viewing विजय वडेवट्टीवार यांच्या वक्तव्याबाबत कारवाई करा.;अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्यात<br>निवेदन..

विजय वडेवट्टीवार यांच्या वक्तव्याबाबत कारवाई करा.;अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्यात
निवेदन..

मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांची पत्रकार परिषद..

कुडाळ /-

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास शांताराम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज ४ सप्टेंबर रोजी कुडाळ पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे यांनां मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने श्री.विजय वडेवट्टीवार यांच्या वक्तव्या बद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.आणि या संदर्भातील माहिती आज ४ सप्टेंबर रोजी कुडाळ एम.आय.डीसी. येथील आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष सुहास सावंत यांनी माहिती दिली.यावेळी मराठा समाजाचे बंड्या सावंत ,संग्राम सावंत ,शैलेश घोगळे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हयाचा जिल्हाध्यक्ष आहे. मी गेली 20 वर्षे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. मराठा समाजाचे काम करीत असताना सुध्दा कायम सर्व जातीत सलोखा निर्माण करण्याचे काम केले. महाराष्ट्र राज्याची पुन्या देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळख आहे. महाराष्ट्र राज्याला संत परंपरेचा मोठा वैचारीक वारसा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बहूजनांचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांची पार्श्वभूमी आहे.अश्याप्रकारे महाराष्ट्राची ओळख ही सुदृढ पुरोगामी व वैचारीक विचारांचा प्रदेश म्हणून आहे. परंतू या वैचारीक वारश्याच्या ओळखीला काही लोक स्वतः च्या वैयक्तिक राजकीय स्वार्था पोटी तिलांजली देत आहेत.

श्री. विजय वडेवट्टीवार यांनी घेतलेल्या शपथीचे उल्लंघन करून सोलापूर येथे दि. 31/08/2021 रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्यात मराठा व ओबीसी समाज या दोन वर्गात तेढ निर्माण व्हावी व मराठा समाजाला त्याला भारतीय घटनेनुसार मिळालेल्या अधिकार व हक्क नाकारण्याच्या हेतूने प्रक्षोभक तसेच चिथावणीखोर वक्तव्य केलेले आहे. त्यांनी सदर मेळाव्यात केलेले वक्तव्य असे आहे.आमचा हे म्हणणे इथपर्यंत ठिक आहे. पण तुमच्यातून या. आम्ही अजिबात मान्य करणार नाही आपणास सगळ्यांना सांगण आहे. काय होवून जाईल ते होवून जाईल, ते आपण पाहून घेतू शहीद झाल्यावर समाधी तर बांधतील.. ते झाल्यावर विनती करू, हात जोडू, नाही झाल तर रस्त्यात उतरू… रस्तावर उतरून नाही झाल तर धनगराच काय, हाय हो… काठी… ती धनगराची काठी घेवून काय करायचे ते ठरवू. त्यांनी असे वक्तव्य केल्यानंतर मेळाव्यातील,लोकांची चेकाळून त्यास प्रतिसाद दिला.

भारतीय राज्य घटनेच्या कलम 15,16, नुसार जो समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्टा मागास आहे अश्या सर्व समाज वर्गाना आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला सदरचे आरक्षण ओबीसी वर्गातून किंवा स्वतंत्ररीत्या मागण्याचा घटनादत्त अधिकार आहे. या अधिकारावर कोणालाही गदा आणता येणार नाही. मराठा समाजाचे नेतृत्व, खासदार मा. छत्रपती संभाजीराजे भोसले करीत आहेत. त्यांच्या घराण्याला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. त्यांच्या घराण्यातील छ. शाहू महाराज यांची ओळख आरक्षणाचे जनक म्हणून केली जाते. मा. खा. संभाजीराजे भोसले आज तोच वारसा पुढे नेत सर्व समाज घटकांसाठी काम करीत आहेत. श्री. विजय वडेवट्टीवार यांच्या वरील वक्तव्यातील “महाराज” हा उल्लेख संभाजी राजे यांच्या संदर्भातील आहे. त्याचप्रमाणे मा. संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत. खासदार या नात्यांने ते ” लोकसेवक” सुध्दा आहेत. सदरचे श्री. विजय वडेवट्टीवार याचे वक्तव्य हे लोकसेवकाला त्याच्या कामापासून परावृत्त करण्यासाठी सुध्दा केलेले आहे. या अगोदर सुध्दा श्री. विजय वडेवट्टीवार यांनी मराठा समाजाचे मागासपण निश्चीत करण्याकरीता घटनेनुसार नेमलेल्या गायकवाड आयोगाविषयी सुध्दा अनुदगार काढलेले होते. सदरचे अनूदगार व दि.31/08/2021 रोजीच्या मेळाव्यात श्री. विजय वडेवट्टीवार यांनी केलेले वक्तव्य हे सर्व समाज माध्यमातून प्रसिध्द झालेले आहे.

श्री. विजय वडेवट्टीवार रा.कायमस्वरूपी ” रानफुल निवास पोटेगाव रोड, गडचिरोली, ता. गडचिरोली जि. गडचिरोली सध्या रा.मंत्रालय मुंबई यांच्या विरुध्द भां.द.वी. कलम 153ब, 189, 504,505 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.त्याचे विरूध्दा कायदेशीर कारवाई करण्यात यावी. म्हणून माझी कायदेशीर फिर्याद आहे.असे मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ऍड.सुहास सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

अभिप्राय द्या..