राजन तेली यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून दाखवावा.;सुशील चिंदरकर

राजन तेली यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून दाखवावा.;सुशील चिंदरकर

कुडाळ /-

आमच्या काळात आम्ही एखाद्या मंत्र्याची गाडी अडवायची म्हटले की अडवून दाखवायचोच, अशा फुशारक्या मारणाऱ्या राजन तेलींनी आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत कधी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे का…? राजन तेली शिवसेनेत असताना सुद्धा रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे वेगळेच असायचे. त्यावेळी राजन तेली नारायण राणेंच्या बाजुला बसुन त्यांचे कान फुकायचे आणि आजही भाजपात तेच काम करतायत. बाकी रस्त्यावरच्या लढाईशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही. नारायण राणेंना संगमेश्वरला अटक झाली तेव्हा राजन तेली त्यांच्यासोबतच होते. त्यावेळी ते का आडवे आले नाहीत…? एवढीच हिंमत होती तर नारायण राणेंना अटक करण्यापासून राजन तेलींनी अटकाव करायला पाहिजे होता. मात्र त्याठिकाणी पोलीसांना बघून त्यांनी प्रमोद जठारांच्या खांद्यावर राणेंची पालखी देऊन सोयीस्करपणे पळ काढला. नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होण्याअगोदर शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांनी थेट इशारा देताना म्हटले होते की, “जर नारायण राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात एक चकार अपशब्द काढला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना त्यांची जनआशीर्वाद यात्रा अडवल्याशिवाय शांत बसणार नाही. ही बातमी समजताच नारायण राणेंनी कणकवलीच्या सभेतुन भाषण न करताच कणकवलीच्या सभेतुन पळ काढला. यावरून शिवसेनेची ताकद समजते. राजन तेलींना शिवसेनेची रस्त्यावरची ताकद अनुभवायची असेल तर नारायण राणेंना त्या पद्धतीचे वक्तव्य करण्यास सांगावे. मग शिवसैनिक कशा प्रकारे आडवे येतात ते समजेल. अशी जोरदार टीका शिवसेनेचे सुशील चिंदरकर यांनी राजन तेली यांच्यावर केली आहे.

अभिप्राय द्या..