You are currently viewing कोंविड सेंटर बंद करू येऊ यासाठी कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने<br>तहसीलदार यांना निवेदन

कोंविड सेंटर बंद करू येऊ यासाठी कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने
तहसीलदार यांना निवेदन

कुडाळ /-

तालुक्यातील महिला व बाल रुग्णालयात सुरू असलेले कोंविड सेंटर बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कुडाळ तालुका व्यापारी संघाच्या वतीने तहसीलदार अमोल पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार असल्यामुळे त्यांची हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मटकर, राजन नाईक, प्रसाद शिरसाठ, जयराम डिगसकर, राजेश मांजरेकर, नितीश महाडेश्वर, महेश ओटवणेकर आदी उपस्थित होते.

निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाचे रूपांतर कोव्हिड केअर सेंटर मध्ये झाले आहे. हे कोव्हिड केअर सेंटर दोन विभागांमध्ये विभागले गेले आहे. खालील मधला जिल्हा परिषदेच्या देखबाली खाली असून वरचा मजला जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात आहे. मात्र हे सेंटर बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आज या सेंटरमध्ये २४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने सेंटर बंद करण्याचा अचानक घेतलेला निर्णयाने रुग्णांचे कुटुंब भयभीत झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातील नागरिक कोरोना तपासणी आणि उपचारासाठी महिला व बाल रुग्णालय यावर अवलंबून आहेत. गेले तीन महिने या रुग्णालयातून असंख्य रुग्ण बरे होऊन गेले आहेत. जिल्हा रुग्णालयाचे कुडाळ पासून अंतर लांब आहे या सर्व बाबींचा विचार करून, आरोग्य विभागाने रुग्णालय बंद न करता रुग्णालयात मधील सुस्थित असलेल्या भागाचा वापर करून रुग्णालयाची दुरुस्ती करावी व रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्याचा विचार करावा. अजूनही पूर्णपणे कोवीडचा रोग संपलेला नाही गणपती उत्सव ला अनेक शहरांमधून कोकणात कुडाळ शहर व आजूबाजूच्या खेड्यांमध्ये अनेक नागरीक येत आहे. दरम्यान आरोग्य तज्ञांनी कोवीडची तीसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा आरोग्य यंत्रणेने महिला व बाल रुग्णालयातील कोव्हिड सेंटर पूर्णपणे बंद केले तर कुडाळ मधील व आसपासच्या खेड्यातील नागरिकांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने कोणत्या विचार केला नाही सेंटर बंद केल्यास नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होईल आणि याला सर्वस्वी शासनच जबाबदार असेल, त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याअगोदर शासनाने त्याचा सारासार विचार करावा आणि हे सेंटर बंद न करता चालू ठेवावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी दिली.

अभिप्राय द्या..