You are currently viewing सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करा.;सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करा.;सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

गणेशोत्सव नियोजनाबाबत आचरा व्यापाऱ्यांशी बैठक संपन्न

आचरा /-


कोरोनाचे सावट अजून कमी झाले नाही यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केले आहे.
आचरा व्यापारी संघटनेच्या पदाधिकारयांशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांनी गणेश चतुर्थी कालावधीत होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने सुरक्षेसाठी मास्क सँनिटायझरचा वापर करून दुकानासमोर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या
यावेळी या बैठकीला आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, विद्यानंद परब,निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, आशिष बागवे, सिद्धांत हजारे,चंदू कदम, पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे आदी उपस्थित होते. यावेळी आठवडा बाजाराच्या अनुषंगाने होणारी गर्दी, आचरा तिठा गर्दी मुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होवू नये या बाबत उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आचरा गावासाठी अतिरिक्त दहा होमगार्ड देण्यात येणार असून गणेश चतुर्थी कालावधीत गर्दीचा फायदा घेत चोरीचे प्रकार होवू नयेत यासाठी आपण स्वतः गस्त घालणार असून व्यापारी बांधवांनीही चौकस राहून असे प्रकार आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे पाटील यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..