बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी गैर क्रूत्य करु नका.;वनपाल शिंदे

बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी गैर क्रूत्य करु नका.;वनपाल शिंदे

आचरा येथे बिबट्या बाबत फलकाद्वारे जाग्रूती..

आचरा /-

आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असून पाळीव जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील भोसले यांच्या वाड्यावर भेट देवून उपस्थितांना बिबट्या बाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी कोणतेही गैर क्रूत्य करू नका ज्या योगे बिबट्या बिथरून हल्ला करेल .बिबट्या दिसल्यास वन कर्मच्यारयांना कळविण्यास सांगितले. यावेळी फलकाद्वारे जागृती करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. यावेळी राजेश भोसले, स्वप्नील गोसावी, मंदार सरजोशी, यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. याद्रूष्टीने युवकांतर्फे बिबट्याचा वावर असलेल्या आचरा पारवाडी ,वरचीवाडी परीसरात जागृती फलक लावण्यात आले.
फोटो–फलकाद्वारे जागृती करताना वनविभाग कर्मचारी सोबत ग्रामस्थ

अभिप्राय द्या..