शिवसेनेचा देवगडात आमदार नितेश राणेंना धक्का.;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपाच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश..

शिवसेनेचा देवगडात आमदार नितेश राणेंना धक्का.;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपाच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश..

सिंधुदुर्ग /-

अखेर आमदार नितेश राणेंना धक्का देत सत्ताधारी भाजपाचे दोन नगरसेवक सेनेच्या गटात दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाजपाच्या नगरसेविका हर्षा ठाकूर आणि विकास कोयंडे यांनी शिवबंधन बांधले आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत च्या राजकारणात उलथापालथ घडवणारी ही घटना असून त्यामुळे भाजपला आणि आम. नितेश राणेंना जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्याचबरोबर कलमठ गावच्या नूतन सरपंच धनश्री मेस्त्री, माईन नूतन सरपंच प्रज्ञा मेस्त्री यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या पक्षप्रवेशासाठी देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, भूषण परूळेकर, ॲड. हर्षद गावडे, रिमेश चव्हाण, बुवा तारी आदी वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..