गणेश चतुर्थी कालावधीत २४ तास अखंड वीजपुरवठा सुरु ठेवा.;वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने वीजवितरणला निवेदन

गणेश चतुर्थी कालावधीत २४ तास अखंड वीजपुरवठा सुरु ठेवा.;वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने वीजवितरणला निवेदन

वेंगुर्ला /-


श्री गणेश चतुर्थी कालावधीत २४ तास अखंड वीजपुरवठा सुरु ठेवण्यात यावा,अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कनिष्ठ अभियंता वीजवितरण कंपनी वेंगुर्ला यांना देण्यात आले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या वेंगुर्ले तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा श्री गणेश चतुर्थी हा
मोठा सण आहे. गतवर्षी कोरोनाच्या लाटेमुळे गणेश चतुर्थी सणास भाविक येऊ शकलेले नव्हते. पण यावर्षी शासनाने बस गाड्या व रेल्वे प्रवासाची व्यवस्था केल्याने गणेश भक्त गणेश उत्सवास मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीच्या २१ दिवसाच्या कालावधीत हा सण प्रत्येक भाविक मोठ्या उत्साहाने साजरा करत असल्याने या कालावधीत भारनियमन असले तरी ते रद्द करावे. विद्युत पुरवठा २४ तास चालू ठेवण्यात यावा. तसेच कोणत्याही तांत्रिक व नैसर्गिक कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सदर बिघाड त्वरित काढून त्या त्या भागातील वीज ग्राहकांची वीज चालू करण्यासाठी लाईनमनला तसे आदेश द्यावेत. या सण कालावधीत तालुक्यात सर्वच विद्युत पुरवठा चालू राहण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावल, सुहास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..