अनिल देशमुखांच्या वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून अटक..

अनिल देशमुखांच्या वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून अटक..

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल.

अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही काल रात्री अटक करण्यात आली होती. सीबीआयने दिल्ली आणि अलाहाबाद येथील त्यांच्या ठिकाण्यांवरही छापे टाकले होते.

अभिप्राय द्या..