You are currently viewing अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी..

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी..

मुंबई /-

परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत राज्याच्या लोकायुक्तांकडून गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

अभिप्राय द्या..