You are currently viewing नवविवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवसूच्या सहाय्यक पोस्ट मास्तरला अटक…<br> 

नवविवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवसूच्या सहाय्यक पोस्ट मास्तरला अटक…
 

सावंतवाडी /-
 
पतीसह सासरच्या व्यक्तींनी आपल्या मुलीला क्रूर वागणूक दिल्यामुळे तिने आत्महत्या केली. असा आरोप मृत नवविवाहीता निधी पास्ते हीचे वडील प्रभाकर माळकर यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवसू पोस्टाचा सहाय्यक पोस्टमास्तर निलेश पास्ते रा. कलंबिस्त यांच्यासह सासू-सासर्‍यांना येथिल पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पत्नी निधी हीने काल रात्री सबनिसवाडा येथिल तुळजा आर्केड या इमारतीत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सकाळी निधी हीचे वडील प्रभाकर माळकर रा. कारीवडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस उपनिरिक्षक जयराम पाटील यांनी दिलेल्या माहीतीनुसार संबधित विवाहीतेचे २०१८ मध्ये निलेश याच्याशी लग्न झाले होते. त्या दिवसापासून आज पर्यत कोणत्या ना कोणत्या कारणाने निलेश व त्याचे आई-वडील आपल्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देत होते. याबाबत आपल्याला ती वेळोवेळी सांगत होती. मात्र आज ना उद्या त्यांचा संसार ठीक होईल म्हणून आपण गप्प होतो. मात्र काल निलेश याने तिच्याशी भांडण काढले आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तीने गळफास लावून आत्महत्या केली. असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह सासरे ज्ञानेश्वर पास्ते व निर्मला पास्ते या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..