परुळे चिपी गाडेधाव येथुन पिंगुळी ते गोवा अशी जोरदार चोरटी वाळू वाहतूक जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोस सुरू!

परुळे चिपी गाडेधाव येथुन पिंगुळी ते गोवा अशी जोरदार चोरटी वाळू वाहतूक जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोस सुरू!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे हे या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करतील का?याकडेही लागले लक्ष

पालकमंत्री ,खासदार ,आमदार मात्र गप्प आहेत

परुळे /-

सध्या परुळे चिपी गाडेधाव येथुन पिंगुळी ते गोवा अशी जोरदार चोरटी वाळु वाहतुक सुरु असुन, तलाठी सर्कल तहसीलदार तर खनिकर्म अधिकारी आणि बिट हवालदार, पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.या त्यांच्या दुर्लक्षा मुळे रोज दिवसा- रात्री सातशे ते आठशे डंपर वाहतुक परुळे ते पिंगुळी अशी चालु असते. यातच या भागातील नागरिकांनी अनेक तक्रारी आहेत.पण तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न निर्माण होतो. सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. तर करोडो रुपयांची राॅयलटी बुडवून मात्र अधिकारी मालामाल झाले असून,या चोरट्या वाळुला आळा कोण घालणार?याकडे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तर या रस्त्यांची चाळण झालेली असुन डंपर वाहतुक मुळे रस्ते खराब झाले असुन सत्ताधा-यांच्या नावाने नागरीक ओरोड मारत असताना पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक मात्र गप्प आहेत

अभिप्राय द्या..