You are currently viewing रेडी येथे पंतप्रधान मातृवंदन योजना सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न..

रेडी येथे पंतप्रधान मातृवंदन योजना सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /-


रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंतप्रधान मातृवंदना योजना सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जि. प.सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत,रेडी सरपंच रामसिंग राणे,डॉ.साळगावकर, डॉ.स्नेहा नवार,डॉ.रश्मी शुक्ला, आरोग्य सहाय्यक ए. एन.गोसावी,आरोग्य सहाय्यीका सुवर्णा वारंग,गटप्रवर्तक राऊळ, आशा वर्कर्स,आरोग्य कर्मचारी,तीन लाभार्थी आदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना कार्यान्वित केल्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधून गेल्या ४ वर्षात ३४० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि बाल व माता यांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ही योजना असून यातून ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.या कार्यक्रमात सरपंच राणे, प्रितेश राऊळ व डॉ. साळगावकर यांनी विचार व्यक्त केले.

अभिप्राय द्या..