You are currently viewing मालवण शहरात स्वखर्चातून नगरसेवक यतीन खोत यांनी केली साफसफाई..

मालवण शहरात स्वखर्चातून नगरसेवक यतीन खोत यांनी केली साफसफाई..

मालवण /-

मालवण नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती,नगरसेवक यतीन खोत यांनी रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, गवत हटविण्याचे काम आज पासून स्वखर्चातून सुरू केले आहे. जनतेप्रति असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून हे काम हाती घेण्यात आले असल्याचे श्री. खोत यांनी स्पष्ट केले.

मालवण पालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. मात्र स्वच्छता विभागात कोरोना प्रादुर्भावामुळे स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी निर्माण होत आहेत. तरीही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करून प्रत्येक समस्येवर मार्ग काढत नागरिकांना सेवा देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न सुरू आहे.

वादळानंतर बहुतांश सर्व ठिकाणी खंडित झालेली स्ट्रीट लाईट सेवा पूर्ववत केली जात आहे. बहुतांश ठिकाणी नवे लाईट बसवण्यात आले आहे. राहिलेले कामही लवकर पूर्ण केले जाणार आहे. त्याबरोबर आगामी गणेशोत्सव लक्षात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत तोडण्याची मागणी शहरात सर्वच भागातून होत आहे. काही ठिकाणी कामही सुरू झाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी लक्षात घेता कामाची व्यापकता मोठी आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता पालिका सहकार्य करण्याच्या उद्देशाने आपल्या तीन नंबर प्रभागात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत स्वखर्चाने तोडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून कामही सुरू झाले आहे. पालिका स्वच्छता विभागाकडून काम होईलच. मात्र लवकर काम पूर्ण व्हावे या उद्देशाने तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रति असलेल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून प्रभागात काम सुरू करण्यात आले आहे. असे नगरसेवक खोत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा