कणकवली /-

कोणीही कितीही जनाशीर्वाद यात्रा काढल्या तरी जनाधार हा फक्त शिवसेनेला आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून आज भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना करणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी कोकण सिंचन उपाध्यक्ष संदेश पारकर, नीलम पालव, बाळा भिसे, शैलेश भोगले, बंडू ठाकूर, संदेश पटेल, सचिन सावंत, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, सुशांत दळवी, भास्कर राणे, मारुती सावंत, उत्तम राणे, माजी सरपंच स्मिता परब, गणेश राणे, अरुण राणे, रोहित राणे, विकास गुरव, सौरभ सावंत,अमोल परब दिलु राणे, आप्पा ठाकूर, प्रभाकर राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे भाजप वरचा लोकांचा अविश्वास वाढत चालला असून त्यामुळेच आजचा हा प्रवेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे. याच जिल्ह्यातील जनतेने राणेंचा तीन वेळा पराभव केला आहे. भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि जनता राणेंचा पराभव करणार हे निश्चित आहे.
यावेळी हळवल गावातील तुलसी पालकर, माजी ग्रा. प सदस्य प्रमिला चव्हाण, रेश्मा चव्हाण, प्रणिता चव्हाण, मनीषा चव्हाण, आरती चव्हाण, प्रणिता पंडित, समता सदानंद सावंत, स्नेहा धुरी, राजश्री मळगावकर, संपदा राणे, एकनाथ मडवळ, सचिन ठाकूर, सदानंद सावंत, दिलीप हळवलकर, रामदास चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर चव्हाण, प्रभाकर चव्हाण, दयानंद चव्हाण, मयूर पांगूळ, प्रथमेश राणे, राजन चव्हाण, अनंत चव्हाण, चैतन्य नाईक, लक्ष्मण सावंत, प्रवीण चव्हाण, किशोरी पाताडे, सूरज राणे, मयूर ठाकूर, सुशील ठाकूर, वसंत ठाकूर, शुभांगी तावडे आदी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page