You are currently viewing सिंधुदुर्गात प्रथमच २३ वर्षाखालील मुला मुलींसाठी ॲथलेटिक्स निवड चाचणी..

सिंधुदुर्गात प्रथमच २३ वर्षाखालील मुला मुलींसाठी ॲथलेटिक्स निवड चाचणी..

कणकवली /-

सिंधुदुर्गात ॲथलेटिक्सचा विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा अमाच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पहिले २३ वर्षा खालील मुला मुलींच्या ॲथलेटिक्स निवड चाचणी २०२१-२२ दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी क्रीडा संकुल ,ओरोस येथे घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी साठी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे. जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी . ज्या खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे त्यांनी २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता खेळाडूंनी सभेसाठी विद्यामंदिर हायस्कूल ,कणकवली येथे यावे.या ठिकाणी सर्व स्पर्धेची माहिती तसेच बिब नऺबर देण्यात येतील .अधिक माहितीसाठी संपर्क समीर ज.राऊत (सह.सचिव ) ८९२८८८३५९४, किंवा अध्यक्ष रणजितसिंह राणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

अभिप्राय द्या..