You are currently viewing अनुदान न मिळाल्याने मुठ – उभादांडा मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी मच्छी विक्रेत्या महिलांसह आमरण उपोषण करणार

अनुदान न मिळाल्याने मुठ – उभादांडा मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी मच्छी विक्रेत्या महिलांसह आमरण उपोषण करणार

वेंगुर्ला /-


सन २०१९ – २०२० या वर्षांत क्यार व महाचक्रीवादळामुळे मासेमारी करता आली नाही, म्हणून शासनाने लहान मासळी विक्रेत्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केले होते.त्यानुसार संस्थेकडुन लहान मासळी विक्रेत्यांचे प्रस्ताव शासनास सादर केले होते. तसेच संस्थेमार्फत रापण संघाचे सुद्धा प्रस्ताव परवाना अधिकारी, मस्त्यविभाग वेंगुर्ले यांना सादर केले होते.परंतु अद्याप पर्यंत लहान मासळी विक्रेत्यांना व रापण संघाना शासकीय अनुदान प्राप्त झाले नाही.याबाबत सातत्याने मुठ – उभादांडा मच्छिमार संस्थेने मस्त्यविभागाशी पत्रव्यवहार केला, परंतु अद्याप पर्यंत मस्त्यविभागाकडून शासनाकडे प्रस्ताव केला आहे, निधी आल्यावर अनुदान देऊ,अशी थातुरमातुर उत्तर देऊन मच्छिमारांची बोळवण केली, म्हणुन नाईलाजाने मच्छिमार संस्थेचे चेअरमन,सेक्रेटरी , संचालक यांनी वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी धी मुठ उभादांडा मच्छिमार सह. सोसा. चेअरमन शेखर धावडे, सेक्रेटरी उमेश तांडेल, गजानन कुबल , दिवाकर कुर्ले, किशोर रेवणकर आदी उपस्थित होते.वेंगुर्ले तालुक्यातील इतर मच्छिमारांना मिळालेले अनुदान फक्त मुठ – उभादांडा येथील लहान मासळी विक्रेत्यांना न मिळाल्याने २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे,अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.तसेच तहसिलदार यांनी यावर तोडगा काढण्यासाठी आपल्या दालनात मस्त्यविभाग अधिकारी व मच्छिमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी,अशी मागणी वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांचेकडे केली आहे.

अभिप्राय द्या..