वेंगुर्ले बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात..

वेंगुर्ले बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले येथे आज नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस स्टेशन,वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी यांच्यातर्फे समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.दरवर्षी वेंगुर्ले बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनामुळे हा सण अगदी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. यावर्षी अनलॉकमुळे हा सण साजरा करता आला. यावेळी वेंगुर्ला पोलिस स्टेशन, तालुका पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे नारळ अर्पण करण्यात आला. वेंगुर्ले पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत आणि राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी नारळाचे विधिवत पूजन केले. त्यानंतर या सर्वांनी समुद्रात नारळ अर्पण केला.
यावेळी महिला पोलिस उपनिरिक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सचिन सावंत, शेखर दाभोलकर, पोलिस हवालदार वासुदेव परब, महिला पोलिस नाईक रुपा वेंगुर्लेकर, पोलिस नाईक गौरव परब, नितीन चोडणकर, विठ्ठल धुरी, पोलिस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, राहूल बरगे, बंटी सावंत,अमर कांडर, महिला कॉन्स्टेबल पूजा भाटे, सुरज रेडकर तसेच पत्रकार समितीचे उपाध्यक्ष के.जी.गावडे, भरत सातोस्कर,सचिव अजित राऊळ, विनायक वारंग, सुरज परब, प्रथमेश गुरव आदी उपस्थित होते. वेंगुर्ले शहरातील नागरिकांनीही समुद्राला नारळ अर्पण केला.

अभिप्राय द्या..