सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा..

सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा..

सावंतवाडी /-


कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे विधीवत पूजन करून मानाचा नारळ मोती तलावास अर्पण करण्यात आला. यावेळी नागरिकांनीही मोती नारळ तलावास नारळ अर्पण केला. यावेळी पोलीस आनंद यशवंते, सतिश कविटकर, महेश जाधव,प्रवीण सापळे, सखाराम भुई, सुनील सावंत, दर्शन सावंत, पगसाद कदम, भूषण भोवर आदी उपस्थित होते. यावेळी नागरीकांची उपस्थिती मात्र कमी होती. त्यामुळे नागरीकांनी फुलून जाणारा मोती तलावाचा काठ मात्र सुना सुना जाणवला.

अभिप्राय द्या..