वेंगुर्ला /-

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेली केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा २७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यामध्ये दाखल होणार आहे.या यात्रेचे न भूतो न भविष्यती असे जल्लोषी स्वागत करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले तालुक्याची नियोजनाची सभा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी जन आशिर्वाद यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला व ठिकठिकाणी भव्य दिव्य स्वागताचे नियोजन करण्यात आले.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सातार्डा मार्गे शिरोडा येथे जन आशिर्वाद यात्रेचे आगमन झाल्यावर शिरोडा नाका येथे रेडी जि.प.मतदार संघाच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मानसी गार्डन येथे तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करुन मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे. यामध्ये शेकडो कार्यकर्ते सामील होणार आहेत.त्यानंतर वेंगुर्ले मार्केट येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे.या सत्काराचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी राणे यांचे स्वागत करणार आहेत. यामध्ये पंतप्रधान आवास योजना,उज्वला गॅस लाभार्थी, शेतकरी सन्मान योजना लाभार्थी,आत्मनिर्भर पॅकेज पथविक्रेते लाभार्थी, महिला बचत गट यांच्या वतीने राणे यांचे स्वागत होणार आहे.यामध्ये विविध समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. नागरी सत्काराच्या निमित्ताने मुस्लिम समाज,ख्रिश्चन समाज , गाबीत समाज,मराठा समाज, ओबीसी समाज,व्यापारी बांधव ,रिक्षा युनियन,देवस्थान कमिटी, गिरणी कामगार तसेच विविध संघटनेच्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.तसेच हा सत्कार सोहळा संपल्यावर मठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वेंगुर्ले तालुक्याच्या दौऱ्याची समाप्ती होणार आहे.या नियोजन बैठकीस जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके व अॅड. सुषमा खानोलकर, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, मनिष दळवी, बाळा सावंत, महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर,नगरसेवक नागेश गावडे, प्रशांत आपटे, नगरसेविका शितल आंगचेकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, ता.चिटनीस समिर चिंदरकर, समिर कुडाळकर, नितीन चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, निलेश मांजरेकर,ज्ञानेश्वर केळजी, दिपक परब,तुळस सरपंच शंकर घारे, महिला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे तुषार साळगांवकर , प्रणव वायंगणकर, सोशल मिडीयाचे अमेय धुरी , बुथप्रमुख विनय गोरे ,नारायण परब ,नारायण गावडे , किशोर परब तसेच तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page