You are currently viewing अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा दणका.;ट्रकसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..

अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा दणका.;ट्रकसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /-

उपवनसंरक्षक नारनवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या जळाऊ लाकूड वाहतुकीला फोंडाघाट वनपाल अनिल जाधव व वनविभागाच्या पथकाने दणका दिला असून अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक व लाकूड असा तब्बल 9 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रकमालक राजेश रमेश राणे, रा.बैरीबांबर, ता.राधानगरी, व चालक अजय धोंडीराम कोंडवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडाघाट एरिगेशन कॉलनीमधून ट्रक क्र. MH 11 – AL – 0029 मधून इंजायली जळाऊ लाकूडाची विनापरवाना वाहतूक होत होती. 21 ऑगस्ट रोजी वनविभागाचे पथक रात्रीची गस्त घालत असताना सदर ट्रक जप्त करून आतील जळाऊ लाकुडासह ट्रक वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. 9 लाख रुपये किंमतीचा ट्रक व 50 हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत वनरक्षक मनेर, शेगावे, सुतार, राठोड, राख, शिर्के, बागवे, लाड आदी सहभागी होते. पुढील तपास कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर करत आहेत.

अभिप्राय द्या..