You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेविका सौ.सुप्रिया समीर नलावडे या दाम्पत्याकडून १०/१२ विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप..

नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेविका सौ.सुप्रिया समीर नलावडे या दाम्पत्याकडून १०/१२ विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप..

कणकवली /-

कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळविलेल्या कणकवली शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. या विद्यार्थ्यानी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे गौरवास्पद असून त्यांच्या गुणांचा गौरव करण्यासाठी रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

तसेच या विद्यार्थ्यांनी पुढील काळात अजून उत्तुंग यश मिळवा,अशा शुभेच्छाही नलावडे दाम्पत्यने या विद्यार्थ्यांना दिल्या. यावेळी कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर हे देखील उपस्थित होते. या सत्कारप्रसंगी संपदा शंकर धुरी, प्रियांका आनंद पारकर, मनाली नितीन तायशेटे, महिमा तांडेल, अनुराग संजय सावळ या विद्यार्थ्यांचा नलावडे दाम्पत्याकडून गुणगौरव करण्यात आला.

अभिप्राय द्या..