You are currently viewing बॕ.खर्डेकर महाविद्यालयात ‘सद्भावना दिन’ साजरा…

बॕ.खर्डेकर महाविद्यालयात ‘सद्भावना दिन’ साजरा…

वेंगुर्ला /-

बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा ‘सद्भावना दिवस‘ म्हणून साजरा करण्यात आला. ‘राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी, विविध जाती-धर्मामध्ये तसेच भाषा व प्रांत यामध्ये सलोखा ठेवण्यासाठी, एकोपा राहण्यासाठी सद्भावना दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी केले. प्रा. सदाशिव चुकेवाड यांनी देशामध्ये राष्ट्रीय एकता, शांती, प्रेम तसेच इतरांप्रती चांगली भावना व्यक्त करुया, असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक चव्हाण, प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर, प्रा. विनोद पवार, सदस्य प्रा. एल. बी. नैताम, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. एम. एम. मुजुमदार तसेच इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..