You are currently viewing विठ्ठल वारकरी मंडळ असनिये तर्फे कोरोना योध्यानचा सन्मान !

विठ्ठल वारकरी मंडळ असनिये तर्फे कोरोना योध्यानचा सन्मान !


सावंतवाडी /-

असनिये गावची कोरोना सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागासह आशाताईनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा पुरविली याची दखल घेऊन श्री विठ्ठल वारकरी मंडळ असनिये यांच्या तर्फे या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात मंडळाचे अध्यक्ष आपा सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत तसेच रत्नाकर सावंत, नामदेव असनकर, ग्रा.पं.सदस्य गजानन सावंत, रुपाली सावंत यांच्या उपस्थितीत आरोग्यसेवक वासंती पालव, आशाताई उर्मिला सावंत, ग्रामसेवक मुकुंद परब, सरपंच स्नेहल असनकर, आरोग्यसेवक श्री. पारधी, पोलिस पाटील विनायक कोळापटे, ग्रा.पं. कर्मचारी आनंद सावंत यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असनिये गावावर फारसा झाला नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची घेतलेली काळजी व त्यांना वेळोवेळी केलेले आरोग्य विषयक मार्गदर्शन फलदायी ठरले. त्यामुळे सद्यस्थितीत गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.आभार गजानन सावंत यांनी मानले.

अभिप्राय द्या..