You are currently viewing आरोंदा माजी सरपंच उमा बुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.;आरोंद्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकाँग्रेसचा धक्का.!

आरोंदा माजी सरपंच उमा बुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.;आरोंद्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकाँग्रेसचा धक्का.!

सावंतवाडी /-

आरोंद्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी शिवसेनेला हा धक्का दिला. माजी सरपंच उमा बुडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आम. शेखर निकम यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सारिका कोळमकर, रेणुका नाईक यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला शिवसेनेकडून डावलण्यात आले असल्यासनेच आपण राष्ट्रवादी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच येणाऱ्या काळात आरोंदात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यास नक्की प्रयत्न करेल व राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

अभिप्राय द्या..