You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.शेखर निकम यांनी जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले जंगी स्वागत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.शेखर निकम यांनी जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले जंगी स्वागत..

कणकवली /-– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे आज खारेपाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आज अनेक राजकिय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात जंगी पक्ष प्रवेश होणार आहे.

दरम्यान खारेपाटण येथे आमदार शेखर निकम यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर अध्यक्ष संदेश मयेकर, विनोद डगरे, अभिजित मेस्त्री, प्रशांत बोभाटे, शैलेश गोसावी, मनोज मेजारी, गणेश मोंडे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खारेपाटण येथे आज सकाळी आमदार शेखर निकम यांचे आगमन होताच त्यांना पुष्पगुच्छ देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यानंतर आमदार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह कुडाळ येथील कार्यक्रमाला रवाना झाले.

अभिप्राय द्या..