मानवाधिकार वेल्फेअरच्या माध्यमातून माणगाव हायस्कूलला सॅनिटायझर,थर्मल गण,मास्क सुपुर्द..

मानवाधिकार वेल्फेअरच्या माध्यमातून माणगाव हायस्कूलला सॅनिटायझर,थर्मल गण,मास्क सुपुर्द..

कुडाळ /-

कोरोनाच्या महामारी काळात गेली दीड-दोन वर्ष शाळा-कॉलेज बंद आहेत.श्री.वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणगाव १७ ऑगस्टपासून काही वर्ग चालू करण्यात आले आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या पुढाकारातून माणगाव हायस्कूलच्या सॅनिटायझर, मास्क,थर्मल गण, वाटप करण्यात आले मुख्याध्यापक श्री.प्रशांत धोंड यांच्याकडे सुपूद करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री राकेश केसरकर,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी,जिल्हा सचिव ॲड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया जिल्हा प्रतिनिधी आनंद कांडरकर,कुडाळ उपतालुकाध्यक्ष अमित देसाई,एकनाथ मेस्त्री,बाळा कोरगांवकर, पत्रकार कृष्णा सावंत उपस्थित होते.

अभिप्राय द्या..