मालवण /-

हडी येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुवा बेटावर गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने या बेटावरील ग्रामस्थांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती कळताच जिज्ञासा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या बेटावरील ३५ कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हडी येथील पाणखोल जुवा बेटाला पुराचा फटका बसल्याची माहिती जिज्ञासा फाऊंडेशन मालवण या सामाजिक संस्थेच्या सदस्यांना मिळताच जिज्ञासा फाऊंडेशन या संस्थेने सर्वोतोपरी प्रयत्न करून मदत जमा करून तेथील ३५ कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य सुपूर्द केले. यावेळी संस्थेचे सभासद श्रेयस हिंदळेकर, सुदर्शन कांबळे, प्रतिक कुबल, रजत दळवी, चेतन जाधव, आदित्य तांबे आणि वैभव आजगावंकर यांच्यासह तेथील रहिवासी विठ्ठल गोलतकर, राजेंद्र शेट्ये, प्रवीण मुणगेकर, संजय मिठबावकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तेथील नागरिकांनी जिज्ञासा फाऊंडेशन मालवणचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page