“त्या ” मच्छीमारांनाही नुकसानभरपाई द्यावी.;देवगडमधील मच्छीमार संस्थांची मागणी..

“त्या ” मच्छीमारांनाही नुकसानभरपाई द्यावी.;देवगडमधील मच्छीमार संस्थांची मागणी..

देवगड /-

कोरोना संसर्ग मे व जून महिन्यात जास्त प्रमाणात असताना अनेक नौकामालक, घरातील सदस्य कोवीड संसर्गामुळे घरी व दवाखान्यात उपचार घेत होते त्यामुळे चक्रीवादळानंतर नुकसानीचा पंचनामा करणे शक्य झाले नाही. तसेच काही मच्छिमार पंचनामा करण्यास जावू शकले नाही अशा सर्व मच्छिमारांचे पंचनामे पुर्ण करून प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी पाठवून द्यावेत अशी मागणी देवगडमधील तिन्ही मच्छिमार संस्थांच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. देवगडमधील देवदूर्ग मच्छिमार संस्था, देवगड फिशरमेन्स सोसायटी व तारामुंबरी मच्छिमारी सहकारी संस्था या तिन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक देवगड फिशरमेन्स सोसायटी या संस्थेमध्ये घेण्यात आली.

यामध्ये तिन्ही मच्छिमार संस्थेंच्या तौक्ते वादळग्रस्त, नुकसानग्रस्त मच्छिमार सभासदांच्या नौकांचे अंशत: नुकसान व मासेमारी जाळ्यांचे पुर्णत: नुकसान या विषयावर चर्चा करण्यात आली. मे व जून 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कोरोना संसर्ग जास्त असल्याने दिवसाला सुमारे 700 पॉझिटीव्ह रूग्ण मिळत होते. अनेक नौकामालक, घरातील सदस्य कोवीड संसर्गामुळे घरी व दवाखाना मध्ये उपचार घेत असल्यामुळे 14 दिवस क्वारंटाईन होते. त्यामुळे चक्रीवादळानंतर नुकसानीचा पंचनामा करणे शक्य झाले नाही. तसेच काही सभासद तौक्ते वादळामुळे व घरगुती अडचणीमुळे पंचनामा करण्यास जावू शकले नाही. अशा सर्व मच्छिमारांचे पंचनामे पुर्ण करून सदर प्रस्ता नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठवून द्यावेत अशी मागणी तिन्ही संस्थांमार्फत करण्यात आली. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मासळीला अपेक्षित दर मिळाला नाही. तसेच डिझेलचे दर गगनाला भिडल्याने मच्छिमारी व्यवसाय पुर्णपणे तोट्यात आहे. त्यामुळे पंचनामा करून त्यांना नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी मच्छिमार संस्थांमार्फ करण्यात आली.

या बैठकीला देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, व्हा. चेअरमन सचिन कदम, सहा. सचिव उमेश कदम, तारामुंबरी मच्छिमारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, व्यवस्थापक अरूण तोरसकर, देवदूर्ग मच्छिमार संस्थेचे सचिव कृष्णा परब उपस्थित होते. दरम्यान सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना मच्छिमार संस्थांच्या सभासदांचे सही असलेले निवेदन देण्यात आले असून यामध्ये चक्रीवादळादरम्यान मे 2021 ते जून 2021 महिन्यात कोवीड संसर्ग जास्त असल्याने व यामध्ये बरेच नौकामालक, मच्छिमार कोवीडने आजारी असल्याने, 14 दिवस क्वारंटाईन असल्याने, तसेच कोवीडनंतर घरी विश्रांती घेत असल्याने चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून देणे शक्य झाले नाही. तरी अशा सर्व मच्छिमारांचे नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून घ्यावेत व वरिष्ठ स्तरावर हा विषय मांडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..