कुडाळ /-

कुडाळ नेरूर येथील ४५ वर्षीय विवाहिता काल दुपारपासून बेपत्ता झाली आहे. विशाखा विनोद परब (रा. ठाकूरवाडी), असे तिचे नाव आहे. दरम्यान याबाबतची खबर तिचे ‘विनोद वसंत परब यांनी पोलिसात दिली.त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली.ती उशिरापर्यंत माघारी परतली नाही. त्यामुळे तिचा घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोठेही आढळून न आल्याने पोलीस ठाणे गाठत ती बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यानुसार कुडाळ पोलिसात बेतत्ताची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page