You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान

वेंगुर्ला /-


माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या प्रेरणेतुन व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या मार्फत तसेच मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेंतर्गत जनशिक्षण संस्थान,सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ले तालुक्यातील ७ हायस्कूल मधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या.अणसूर – पाल हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई ,परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर,ज्येष्ठ नेते बाळा सावंत, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केळजी,माजी मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर,अणसुर – पाल हायस्कुलच्या मुख्याध्यापिका शैलजा वेटे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी दिलेल्या सायकलचा वापर मुलींनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा. तसेच गरीब विद्यार्थिनींना हायस्कूल मध्ये येताना होणारा त्रास कमी करण्यासाठी सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून ” सायकल बॅंक ” ही संकल्पना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील गरीब विद्यार्थिनींना सायकल दिल्याबद्दल सुरेश प्रभु व उमा प्रभु यांचे आभार मानले.या कार्यक्रमाला आडेली हायस्कूलचे सुनिल जाधव, केळुस हायस्कूलचे भालचंद्र थवी,रेडी हायस्कूलचे चंद्रशेखर जाधव,मातोंड हायस्कूलचे सतीश चांदणे,तुळस हायस्कूलच्या आश्विनी नाईक, शिरोडा हायस्कूलचे राजु चव्हाण इत्यादी मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी मुख्याध्यापक एम. जी. मातोंडकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..