पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर चार विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त..

सावंतवाडी /-

सन २०२०-२१ मध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले. या शाळेतील या परीक्षेस बसलेले अकराही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यातील तब्बल नऊ विद्यार्थी गुणवत्ताधारक व मेडलधारक ठरले. पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व चार विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त झाले. यात विवेक गेळे (तिसरी) याने १०० पैकी ९८ गुण, मानस कोचरेकर (पहिली) १०० पैकी ९६ गुण, कु.तन्वी दळवी (चौथी ) हिने ९५ गुण, विघ्नेश राऊळ (चौथी) ८९ गुण तर दिक्षा राऊळ (चौथी) हिने ८७ गुण मिळवून या या पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले. तर दिप्तेश रेडकर (दुसरी) याने १०० पैकी ९२ गुण, हर्ष राऊळ (दुसरी) याने ९१ गुण, रुणाल पेडणेकर (तिसरी) याने ९३ गुण, गौरी राऊळ (तिसरी) हिने ९२ गुण मिळवून मिळवून सर्वांनी सिल्व्हर मेडल पटकावले. मागील वर्षीही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपली चुणूक दाखवली होती. या परीक्षेसाठी मुख्याध्यापक प्रसाद दळवी व उपशिक्षिका अर्चना तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,आजगाव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख मळगाव शिवाजी गावीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र राऊळ, उपाध्यक्ष महेश राऊळ , सर्व सदस्य व मळगाव ब्राम्हणआळी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page