मिठबांव कबीर नगर येथील मंडळींकडून आपत्तीग्रस्तांना मदत…

मिठबांव कबीर नगर येथील मंडळींकडून आपत्तीग्रस्तांना मदत…

देवगड /-


देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दत्ता मिठबावकर व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत करण्यात आली.
1)विविध प्रकारची भांडी,तांदुळ, तेल व विविध अन्य जीवनावश्यक वस्तू , तसेच महिलांसाठी साड्या,मुलांसाठी विविध कपडे.(90,000)
2.विनय मोहिते, विराज मोहिते, सुजल मोहिते, राणी मोहिते या अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 10,000/- FD स्वरूपात. (40,000)
3.पोसरे बौद्धवाडीतील सामाजिक कार्यकर्ते शाम मोहिते, सुरज मोहिते, सुजल मोहिते याच्याकडे औषधोपचारासाठी रोख रक्कम 22,000/- सुपुर्द करण्यात आली.
यावेळी शरदचंद्र सहदेव जाधव~ मिठबांवकर,पोलीस पाटील जयवंत मिठबांवकर,शाम कदम,शैलेंद्र मिठबांवकर,संजू मिठबांवकर,मंदार ढोके,राजेंद्र मिठबांवकर,अतुल मिठबांवकर,विक्रांत मिठबांवकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..