प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांचा प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते यथोचित  करण्यात आला सत्कार..

प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांचा प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते यथोचित करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी  /-


श्रीमती निशा पावर यांनी भुसापादनाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी सोपावलेली कामे वेळेत पार पाडली आहेत. तसेच covid च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळातील उपविभागातील अडकलेले परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक यांना त्यांच्या गावी पोहोचविन्या करिता चांगले काम केले आहे. कोविड विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून आल्यास आरोग्य विभागाशी समन्वय साधून संबंधित क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्र घोषित कारण्याबाबतचे आदेश तयार करणे, दूरध्वनी वरून संपर्क साधून अद्ययावत माहिती देणे आदी कामे त्यांनी उत्कृष्ट रित्या पार पडलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा महसूल दिनी गौरव करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ला तहसीलदार लोकरे, दोडामार्ग तहसीलदार खानोलकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..