शासनाचा आदेश होईपर्यंत सद्गुरू बाळूमामा मंदिर बंद.;देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम..

शासनाचा आदेश होईपर्यंत सद्गुरू बाळूमामा मंदिर बंद.;देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम..

‘दि.७ व ८ ऑगस्ट रोजी अमावस्येला भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये!’

वैभववाडी /-

कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील क्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामाचे मंदिर अमावस्या दिवशी म्हणजे शनिवार दि. ०७ ऑगस्ट व रविवार दि. ०८ ऑगस्ट रोजी तसेच इतर दिवशीही शासकीय आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या संदर्भातील बैठक आदमापुर येथील बाळूमामा देवालयात पार पडली भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी केले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजय गुरव उपस्थित होते.

अभिप्राय द्या..