You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप..

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे तसेच अन्नधान्याचे नुकसान झाले होते. या सर्व पूरबाधितांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही मदत करण्यात आली तर पूरबाधित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या वतीने आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली तसेच या कुटुंबांना आवश्यक असलेले गृहपयोगी साहित्य, धान्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती सुनील भोगटे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने पूरबाधितांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे अनेक कुटुंबांना ही मदत केली जात आहे या ठिकाणी जी पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये आपले नुकसान झाले हे नुकसान सगळं भरून येऊ शकत नाही पण मदत आम्ही निश्चित करू असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, अल्पसंख्यांक सेलचे कार्याध्यक्ष नासिर शेख, अल्पसंख्यांकांचे जिल्हा उपाध्यक्ष सर्फराज नाईक, सीराज शहा डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. लिंगवत, शहर अध्यक्ष संग्राम सावंत, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. पाटील, उपाध्यक्ष साबा पाटकर, युवकचे जिल्हा सचिव हितेश कुडाळकर, जयराम डिगसकर, शहर अध्यक्ष हेमंत कांदे, यश भोगटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पूर बाधित यांसाठी मदत करण्यात आली.

अभिप्राय द्या..